भारताचे पंतप्रधान हे भारतीय संसदीय शासनव्यवस्थेचे शासन प्रमुख असतात.
भारतीय राज्यघटना कलम 74 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना सल्ला व सहाय्य करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळाची निर्मिती केलेली असते. भारताचे पंतप्रधान यांना आपली कार्ये पार पाडताना राष्ट्रपती यांच्या सल्ल्यानुसार काम करावे लागते .राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात तर पंतप्रधान हे संसदीय शासन व्यवस्थेचे शासन प्रमुख आहेत.
Prime Minister Information in Marathi
भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान –
क्र.म | पंतप्रधानांचे नाव | कालावधी |
1 | पंडित जवाहरलाल नेहरू | १९४७ ते १९६४ |
2 | लाल बहादूर शास्त्री | १९६४ ते १९६६ |
3 | इंदिरा गांधी | १९६६ ते १९७७ |
4 | मोरारजी देसाई | १९७७ ते १९७९ |
5 | चौधरी चरण सिंग | १९७९ ते १९८० |
6 | इंदिरा गांधी | १९८० ते १९८४ |
7 | राजीव गांधी | १९८४ ते १९८९ |
8 | वी. पी. सिंग | १९८९ ते १९९० |
9 | चंद्रशेखर | १९९० ते १९९१ |
10 | पी. व्ही. नरसिंह राव | १९९१ ते १९९६ |
11 | अटल बिहारी वाजपेयी | १९९६ ते १९९७ |
12 | आय. के. गुजराल | १९९७ ते १९९८ |
13 | अटल बिहारी वाजपेयी | १९९८ ते २००४ |
14 | डॉ. मनमोहन सिंग | २००४ ते २०१४ |
15 | नरेंद्र मोदी | २०१४ ते आज |
नियुक्ती
भारतीय राज्यघटनेमध्ये पंतप्रधानांच्या नियुक्तीसाठी कोणतीही विशेष प्रकारची पद्धत सांगितलेली नाही. परंतु भारतीय राज्यघटना कलम 75 नुसार राष्ट्रपती यांना पंतप्रधानांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे.
संसदीय शासन पद्धती मधील संकेतांनुसार लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाचा नेत्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतो.
शपथ
पंतप्रधान यांना आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीं मार्फत वृत्त व गोपनीयतेची शपथ देण्यात येते
कालावधी
भारतीय राज्यघटनेमध्ये पंतप्रधानांचा कालावधी निश्चित केलेला नाही राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पंतप्रधान आपले पद धारण करतात. राष्ट्रपती पंतप्रधानांना केव्हाही पदावरून दूर करू शकत नाहीत . पंतप्रधान यांना लोकसभेमध्ये जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकत नाहीत.
पगार व भत्ते
पंतप्रधान यांचा पगार व भत्ता संस्थेद्वारे कायद्याने वेळोवेळी निश्चित केला जातो .पंतप्रधान यांना संसदेच्या सदस्या एवढाच पगार व भत्ता प्राप्त होतो आणि त्याव्यतिरिक्त पंतप्रधान यांना खाजगी खर्च फक्त मोफत निवास प्रवास भत्ता वैद्यकीय बघता इत्यादी सुविधा दिल्या जातात .
भारताचे पंतप्रधानांचे अधिकार व कार्य
- पंतप्रधानाना केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता या नात्याने मंत्रिमंडळाच्या संदर्भात पुढील अधिकार असतात.
- राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना नियुक्त करतात . ज्यांच्या नावाची शिफारस पंतप्रधानांनी केलेली असते केवळ अशाच व्यक्तीची नियुक्ती मंत्री म्हणून राष्ट्रपती करू शकतात.
- खातेवाटप आणि आवश्यकतेनुसार बदल पंतप्रधान मंत्र्यांमध्ये करू शकतात .
- मंत्री मंडळाच्या सभांचे अध्यक्षस्थान पंतप्रधान यांच्या द्वारे भूषवले जाते.
- सर्व मंत्र्यांच्या कृती कार्यांचे मार्गदर्शन दिशादर्शन समन्वयन घडवून आणण्याचे कार्य पंतप्रधान करतात . पंतप्रधान हे शासनाच्या धोरणांमध्ये समन्वय राखतात.
- पंतप्रधान यांनी जर राजीनामा दिला तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो.
- पंतप्रधान यांनी राजीनामा दिला असता किंवा त्यांचा मृत्यू झाला असता मंत्रीमंडळ विसर्जित होऊन राजकीय खंड किंवा पोकळी निर्माण होऊ शकते.
- राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील संपर्काचे माध्यम पंतप्रधान हे असतात . भारतीय राज्यघटना कलम 70 नुसार पंतप्रधानांची कार्य पुढील प्रमाणे-
- संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनाशी संबंधित असलेले मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय व विधानाची सर्व प्रस्ताव राष्ट्रपती यांना कळविणे.
- राष्ट्रपती संघराज्याच्या कारभाराचे प्रशासन व विधानाचे प्रस्ताव याबाबत जी माहिती मागतील ती पुरविणे.
- एखाद्या मंत्र्याने ज्या बाबीवर निर्णय घेतला आहे परंतु मंत्रिमंडळा मध्ये त्याचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब राष्ट्रपतीनी आवश्यक केल्यास मंत्रिमंडळाच्या विचारार्थ पंतप्रधान यांनी सादर करणे.
- भारताचे लेखापाल, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, मुख्य व अन्य निवडणूक आयुक्त, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य इ. यांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतात
- पंतप्रधान हे निती आयोग, राष्ट्रीय एकात्मता परिषद, आंतरराज्य परिषद, राष्ट्रीय जलसंपदा परिषद या आयोग व परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करावे लागते.
- देशाच्या परकीय धोरणाचा आकार देण्यामध्ये पंतप्रधान यांची महत्त्वाची भूमिका असते .
- केंद्र सरकार चे प्रमुख प्रवक्ता म्हणून पंतप्रधान हे कार्य करतात.