महिलांना मिळणारी प्रसूती रजा आणि फायदे | Maternity leave Information in Marathi
कंपनी व कामगार कायदा

महिलांना मिळणारी प्रसूती रजा आणि फायदे | Maternity leave Information in Marathi

मॅटर्निटी बेनिफिट अ‍ॅक्ट १९६१ ने भारतातील गरोदर स्त्रियांना काही सुविधा व फायदे दिले आहेत. या सर्व फायद्यांचे आणि सवलतींची विश्लेषण ह्या लेखांमधून करणार आहोत.

महिलांना मिळणारी प्रसूती रजा आणि फायदे |

•भारतातील नोकरदार महिलांना मॅटर्निटी बेनिफिट अ‍ॅक्ट १९६१ मुळे मिळणाऱ्या प्रसूती रजे बद्दल माहिती खालील प्रमाणे –
१) भारतातील नोकरदार महिलांना गरोदर असताना सशुल्क रजा मिळते.
२) गर्भवती महिलेला सशुल्क २६ आठवडे प्रसूती रजेचा अधिकार आहे. एकूण आठवड्यांपैकी प्रसूतीपूर्वी जास्तीत जास्त ८ आठवडे प्रसूती रजा मिळू शकते.
3) गर्भवती स्त्रीला प्रसूतीमुळे किंवा गर्भपात मुळे जर एखादा आजार उद्भवला असेल तर व त्यातून त्रास होत असलेस १ महिन्याची अतिरिक्त अशी सशुल्क रजा मिळते.

प्रसूती रजेसाठी लागणारी पात्रता

  • एखाद्या संस्थेत कर्मचारी म्हणून काम करत असाल .
  • तुम्ही गरोदर असाल किंवा दत्तक घेणारी आई आहात.
  • तुमच्या संस्थेमध्ये किमान 10 कर्मचारी आहेत.
  • तुम्ही जर गरोदर असाल तर तुमच्या डिलिव्हरीच्या तारखेच्या आधी 12 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही संस्थेमध्ये किमान 160 दिवस काम केले असेल.

Maternity leave Information in Marathi

भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम 42 मध्ये असे म्हटले आहे की “राज्य कामाच्या न्याय्य आणि मानवी परिस्थिती सुरक्षित करण्यासाठी आणि मातृत्व आरामासाठी तरतूद करेल”.

सुप्रीम कोर्ट आणि विविध राज्यांच्या हाय कोर्ट्सने अनेक केस मध्ये प्रसूती रजेबद्दल महिलांच्या बाजूने निकाल दिले आहेत.

अंशू राणी विरुद्ध यू .पी सरकार

ह्या केस मध्ये याचिकाकर्त्या महिलेला १८० दिवसांऐवजी ९० दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. ह्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने असा निकाल दिला कि सर्व महिलांना १८० दिवसांच्या सशुल्क प्रसूती रजा मंजूर केली पाहिजे व अशी रजा मंजूर करताना महिलेच्या नोकरीचे स्वरूप हे कंत्राटी , कायमस्वरूपी कि तात्पुरते आहे ह्या गोष्टी विचारात घेतल्या जाऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *