राज्यघटना

Loksabha Information in Marathi | भारताची लोकसभा माहिती मराठी

Loksabha Information in Marathi | भारताची लोकसभा माहिती मराठी- भारतीय संसदेत लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. भारतीय संसद मध्ये राज्यसभा (वरिष्ठ सभागृह) , लोकसभा (कनिष्ठ सभागृह) आणि भारताचे राष्ट्रपती असतात.

लोकसभेची रचना

 • लोकसभेमध्ये कमाल ५५२ प्रतिनिधी असतात.
 • ज्यामध्ये ५३० प्रतिनिधी हे राज्यांचे प्रतिनिधित्व करतात तसेच
 • 20 प्रतिनिधी केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात.
 • अँग्लो-इंडियन समुदायातून भारताच्या राष्ट्रपतींद्वारे 2 प्रतिनिधी नामनिर्देशित केले जातात.

सध्याची लोकसभेची रचना

 • एकूण प्रतिनिधी – 545
 • राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे – 530
 • केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व – 13
 • राष्ट्रपतींकडून अँग्लो-इंडियन समुदायातून नामनिर्देशित केलेले – 2

लोकसभा निवडणूक

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे लोकसभेचे सदस्य राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून येतात .लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. १८ वर्षापेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय नागरिक मतदानास पात्र आहे. सन १९८८ च्य ६१ व्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. भारताचे राष्ट्रपती अँग्लो-इंडियन समुदायातील 2 सदस्यांना नामनिर्देशित करतात.

 • सन 1952 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक झाली.
 • पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान झाले.
 • सध्या 2019 साली लोकसभा निवडणुक झाली असून.
 • नरेंद्र मोदी हे भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत.

लोकसभेचे अध्यक्ष

लोकसभेचे अध्यक्ष हे सर्व सदस्य मधून निवडले जातात. अध्यक्षांची निवड झालेनंतर लोकसभेचे कामकाज अध्यक्ष चालवतात आणि विधेयक मनी बिल आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार सुद्धा लोकसभा अध्यक्षांचा असतो.

 • गणेश वासुदेव मावळणकर ह्यांनी लोकसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून काम पहिले.
 • सध्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *