Online Ferfar utara information
कृषी कायदे

फेरफार म्हणजे काय -ऑनलाईन जमीन फेरफार कसा पाहायचा ? Online Ferfar utara information

जमिनी बद्दल व्यवहार करताना वारंवार ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे फेरफार. या लेखात आपण फेरफार म्हणजे काय तसेच त्याचे प्रकार कोण कोणते आहेत हे पाहणार आहोत.

फेरफार म्हणजे काय –

शेतजमिनीच्या कामकाजा वेळी अनेकदा फेरफार, सातबारा,8-अ चा उतारा असे शब्द ऐकत असतो.बरेच जणांना फेरफार म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार किती असतात त्याच्या नोंदी कश्या प्रकारे केल्या जातात याची माहिती नसते.आज आपण फेरफार बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
फेरफार म्हणजेच गाव नमुना नं -6 ची नोंदवही.याला नोंदीचा उतारा किंवा गाव नमुना ड असे ही म्हटले जाते.या फेरफार नोंदवही मध्ये जमिनीची खरेदी विक्री,खरेदी रक्कम व तारिख ,वारस नोंदी, शेतीवरील बोजा चढवणे,गहाण (म्हणजेच मोर्टगेज) अश्या नोंदी या नोंदवही मध्ये केल्या जातात. आणि यामधील नोंदीच 7/12 वर येतात. कोणताही हक्क नोंदविण्यापूर्वी फेरफार नोंदवही मध्ये नोंद करावी लागते त्यानंतरच या नोंदी 7/12वर येतात. वास्तविकरित्या पाहता फेरफारची नोंदवही ही फेरफारची दैनंदिनी असते.जस जसा जमिनीच्या अधिकारामध्ये बदल होईल त्याप्रमाणे या फेरफार नोंदवही मध्ये अनुक्रमे या नोंदी केल्या जातात.

•उदाहरणार्थ

1) एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता त्या व्यक्तीचा गावानमुना 7 मधील हक्क रद्द होणार आणि त्याठिकाणी वारस नोंद होणार म्हणजेच त्या मृत व्यक्तीच्या पत्नीचे अथवा मुलांचे नाव समाविष्ठ केले जाणार. या बदलास फेरफार नोंद म्हणतात.
2)स्वमालकीची जमीन जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विकली तर जमीन विकणाऱ्या व्यक्तीतीचे गावानमुना 7 मधील हक्क रद्द होणार आणि त्याठिकाणी जमीन विकत घेणाऱ्या वक्तीचे नाव समाविष्ट केले जाणार.या बदलास फेरफार नोंद म्हणतात.
गाव नमुना 7 व 12 मध्ये कायदेशीर मान्यतेने व कोणत्याही कारणास्तव करण्यात आलेले बदल, अश्या बदलांना महसूल विभागाप्रमाणे फेरफार असे म्हटले अथवा संबोधले जाते.

•फेरफार नोंदवहीचे म्हणजेच गाव नमुना 6 चे चार प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे –
•गाव नमुना 6 नं -फेरफारची नोंदवही
1) 6 अ – विवादग्रस्त प्रकारणांची नोंदवही
2) 6 ब – विलंब शुल्क नोंदवही
3) 6 क – वारस प्रकारणांची नोंदवही
4) 6 ड – पोट हिस्यांची नोंदवही

•फेरफारच्या नोंदी कोण करते –
फेरफार च्या नोंदी करण्याचा अधिकार तलाठी ला असतो.फेरफार नोंदी तलाठी कडून लिहल्या जातात परंतु या नोंदी मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार तलाठीला नसून मंडळ अधिकारी किंवा सर्कल अधिकारी या नोंदी प्रमाणित करतात.

•फेरफारची नोंद कशी केली जाते –
फेरफारची नोंद करण्याकरता 4 स्तंभ आखले जातात, अर्थातच पहिल्या स्तंभात अनुक्रमांक लिहला जातो. दुसऱ्या स्तंभामध्ये हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधीकारांचे स्वरूप लिहले जाते.यामध्ये व्यवहाराचे स्वरूप, संबंधित असलेल्या खातेदारची नावे,मोबदला रक्कम,व्यवहाराचा दिनांक, सूचना मिळालेचा दिनांक,फेफरचा दिनांक इ.तपशील दुसऱ्या स्तंभामध्ये लिहला जातो. तिसऱ्या स्तंभामध्ये जमिनीचा व्यवहार ज्या सर्वे नंबर किंवा गट नंबर शी संबंधित आहे त्याचा नंबर लिहला जातो.चौथ्या स्तंभामध्ये केलेल्या फेरफारत संबंधित असलेल्याना नोटीस दिली जाते त्यानंतर चौकशी करुन व केलेला फेरफार बरोबर करण्यात असलेला आहे याची स्वतः खात्री करुन मंडळ अधिकारी अथवा सर्कल अधिकारी त्यांचा आदेश स्तंभ चारमध्ये व पदनाम लिहून स्वाक्षरी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *