ग्रामीण भागात सातबारा ,आठ अ, मोजणी, वारस नोंद पीक पाहणी, असे अनेक शब्द लोकांच्या दैनंदिन जीवनात ऐकण्यात येत असतात. म्हणूनच आपण या लेखात आठ अ बाबतची माहिती घेणार आहोत. यामध्ये 8 अ उतारा म्हणजे काय? 8 अ उतारा कसा काढावा? 8अ चा उतारा कसा वाचायचा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखा मार्फत देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जमिनी बाबतच्या दस्ताऐवजांमध्ये 8अ चा उतारा हा एक महत्वपूर्ण गाव नमुना आहे.
8 अ उतारा म्हणजे काय ?
8 अ च्या उतारावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या त्या गावातील असणाऱ्या सर्व जमीन विषयी माहिती एकाच ठिकाणी मिळते. 8अ चा उतारा समजून घेण्यासाठी आपणास तो कसा वाचावा हे माहिती करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे
8 अ उतारा ऑनलाइन कसा काढावा.?
महाराष्ट्र शासनाने सर्व नागरिकांसाठी त्यांच्या जमिनीसंबंधी माहितीसाठी महाभूलेख हे पोर्टल सुरू केले असून त्यामध्ये जमिनी संबंधित अनेक माहिती पाहू शकतो.
www.bhulekh.mahabhumi.gov.in ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट असून यामध्ये ऑनलाईन 8 अ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच ऑनलाईन 8 अ वर डिजिटल साईन असल्यामुळे तलाठी व तहसीलदार यांची सही घेण्याची गरज लागत नाही.
8अ चा उतारा
8अ चा उतारा मध्ये एकूण सात प्रकारची कॉलम असतात प्रकारचे.
पहिला कॉलम –
या कॉलम मध्ये गाव नमुना क्रमांक सहा मधील नोंदी असतात या कॉलम मध्ये खातेदाराचा नोंद क्रमांक असतो.
तसेच खातेदाराचे क्षेत्र हे सामायिक आहे की व्यक्तिगत आहे याची नोंद केलेली असते.
दुसरा कॉलम –
या कॉलम मध्ये खातेदाराचे नाव असते तसेच भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक सुद्धा असतो.
जर क्षेत्र हे सामायिक असेल तर या कॉलम मध्ये सर्व जमीन मालकांची नावे असतात.
या कॉलम मुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती व कोण कोणत्या गटात जमीन नावावर आहे हे कळून येते
तिसरा कॉलम – कॉलम नंबर 3 मध्ये संबंधित व्यक्तीच्या नावावर त्या ग्रामपंचायत हद्दीत किती क्षेत्र आहे हे कळते.
चौथा कॉलम –
कॉलम नंबर ४ हा कर संबंधित आहे यामध्ये कराची आकारणी दिलेली असते . या करा चे स्वरूप रुपये व पैशात असते .
यातून आपल्याला संबंधित व्यक्तीच्या वेगवेगळ्या गटातील जमिनीवर किती कर आकारला जात आहे याची माहिती या रकान्यातून मिळते.
पाचवा कॉलम – कॉलम नंबर ५ हा दुमला जमिनीवरील नुकसान हा असतो.
सहावा कॉलम –
कॉलम नंबर सहा हा स्थानिक करा संबंधित आहे. या स्थानिक करांमध्ये दोन उपप्रकार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद व ग्रामपंचायत असे दोन उपप्रकार आहेत .
सहा (अ ) मध्ये जिल्हा परिषदेने जमिनी वर लावलेला कर दर्शविला आहे तसेच सहा (ब ) मध्ये ग्रामपंचायतने लावलेला कर दर्शविला आहे.
सातवा कॉलम – कॉलम नंबर 7 मध्ये करांची एकूण बेरीज केलेली असते. यातून संबंधित व्यक्तीला किती कर भरावा लागेल याची माहिती दिलेली असते