आंतरराष्ट्रीय न्यायालय-International Court of Justice information in Marathi
आंतरराष्ट्रीय कायदा

आंतरराष्ट्रीय न्यायालय-International Court of Justice information in Marathi

आंतरराष्ट्रीय न्यायालय-International Court of Justice information (ICJ) in Marathi – आंतरराष्ट्रीय न्यायालय ची स्थापना सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सनदेद्वारे करण्यात आली. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँड्स देशातील हेग या शहरात असलेल्या पीस पॅलेस मधून आपले कामकाज चालवते. दोन किंवा अनेक देशामधील वाद विवाद तसेच कायदेशीर बाबींचे निराकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात करणेत येते.

आंतरराष्ट्रीय न्यायालय-International Court of Justice information in Marathi

संरचना

आंतराष्ट्रीय न्यायालयात एकूण १५ न्यायधीश असतात. तसेच या न्यायाधीशांचा कार्यकाळ प्रत्येकी ९ वर्षाचा असतो. न्यायाधीशांचा कार्यकाळ प्रत्येकी नऊ वर्षांचा असतो. या न्यायाधीशांची निवड हि संयुक्त राष्ट्र महासभा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद द्वारे केली जाते. निवडून येण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद दोन्हीमध्ये उमेदवाराला पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे. एकाच देशामधील दोन नागरिकांना आंतराष्ट्रीय न्यायालयात न्यायधीश म्हणून निवडले जात नाही. दर तीन वर्षांनी एक तृतीयांश जागांसाठी निवडणुका होतात आणि निवृत्त न्यायाधीशांची पुन्हा निवड होऊ शकते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य हे पारदर्शक पणे काम करतात ते कोणत्याची देशाचे वा सरकारचे प्रतिनिधित्व करत नाही.

आंतराष्ट्रीय न्यायालयाचे 15 न्यायाधीश खालील प्रदेशातून घेतले जातात

अ. क्र प्रदेशसंख्या
1आफ्रिका3
2लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन2
3आशिया3
4पश्चिम युरोप आणि इतर राज्यांतील5
5पूर्व युरोप2

प्रश्न – आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
उत्तर
– नेदरलँड्स देशातील हेग या शहरात आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *