जागतिक आरोग्य संघटना माहिती : WHO information in Marathi. Full form of WHO is World Health Organisation
जागतिक आरोग्य संघटना ही सार्वजनिक आरोग्यासंबंधित असलेली कामे करणारी एक विशेष संस्था आहे. सन 1948 सर्व देश एकत्र आले,एकमेकांना सहाय्य करून, मैत्रीचे वातावरण निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र (UN म्हणजेच United Nation ) ची स्थापना करण्यात आली.त्यानंतर UNESCO, IMF, World Bank, WHO व इ. विविध संस्थानची स्थापन संयुक्त राष्ट्र द्वारे करण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना –
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी करण्यात आली. जागतिक आरोग्य दिन (World Health Day) हा दिवस ७ एप्रिल ला साजरा केला जातो .
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य उदिष्ट हे लोकांच्या आरोग्याचा स्तर वाढवणे व आरोग्याच्या सोयी सुविधा सर्वांना समान रित्या मिळाल्या पाहिजेत .
जगातील १९४ देश हे जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद आहेत.
जागतिक आरोग्य संघटना याच्या घटनेवर संयुक्त राष्ट्रांच्या सर्व ५१ देशांनी आणि इतर १० देशांनी 22 जुलै 1946 रोजी स्वाक्षरी करण्यात आल्या.
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे?-
- जागतिक आरोग्य संघटनेचे जगभरात एकूण १५० विभागीय कार्यालये आणि ६ मुख्य कार्यालये आहेत.
- जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय हे स्विझरलँड मधील जेनेव्हा, या शहरात आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेचे भारतामधील मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेचे वर्तमान अध्यक्ष डॉक्टर टैड्रोस ऐडरेनॉम ग़ैबरेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) हे आहेत.
- पाच -पाच वर्षांचे दोन कार्यकाळ म्हणजेच एकूण दहा वर्ष कार्य केल्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष रिटायर होतात.
जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी –
- जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी मिळतो.
- सभासद असणारे एकूण 194 देश हे दरवर्षी काही ठराविक रक्कम जागतिक आरोग्य संघटनेला देतात.या मिळाल्या निधीतून ओषध, लस,संशोधन,आणि यंत्र सामग्री अश्या इतर गोष्टींवर खर्च केला जातो.
- सरकारी व सामाजिक संस्था, जागतिक बँक याद्वारे जागतिक आरोग्य संघटनेला निधी पुरवला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्य –
विविध रोगांवर संशोधन करून त्यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना कार्य करते. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत अति गंभीर स्वरूपाचे 10 रोग शोधलेले असुन , यातील काही रोगावर लस शोधण्यात यश देखील आलेले आहे आणि काही रोगावरची लस शोधण्याचे म्हणजेच संशोधणाचे कार्य अजून सुरु आहे.
1980 साली जागतिक आरोग्य संघटनेने स्मॉल पॉक्स नावाच्या रोगांवर देखील मात केली हे आत्तापर्यन्तचे महत्वाचे संशोधन म्हणजे आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला पोलिओ आणि इबोला या रोगावर देखील मात करण्यामध्ये यश मिळालेले आहे.
महामारीच्या काळात निधीच्या अभावामुळे अथवा काही इतर कारणामुळे गरीब देशापर्यंत मदत पोचत नाही.परंतु जागतिक आरोग्य संघटनेमुळे सर्वाना सामान आरोग्य सोयी सुविधा मिळाल्या व हेच मूळ उद्दिष्ट ठेवून जागतिक आरोग्य संघटना कार्य करते. देश, गरीब असो किंवा श्रीमंत सर्वाना सामान आरोग्य सेवा-सुविधा पुरवण्याचे कार्य जागतिक आरोग्य संघटना करते.
One Reply to “जागतिक आरोग्य संघटना माहिती : WHO information in Marathi”